Share

पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली अखेर ‘या’ नेत्याच्या गळ्यात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आता पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी जळगावचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्याकडे यावी, यासाठी शहरातील अनेक आमदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले होते. अनेक आमदारांची नावे चर्चेत होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या चार महिन्यांसाठी पुण्यातून नाव दिले तर एका आमदाराच्या पारड्यात झुकते माप दिल्यास रुसवे फुगवे होऊ शकतात. अशातच गटातटाचे राजकारण निर्माण होऊ शकते, अशी शक्‍यता धरून शहरातून पालकमंत्री न देताना बाहेरील जिल्ह्यातील मंत्र्यास पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!