टीम महाराष्ट्र देशा : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’.. हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर गेल्यावर्षी मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशी सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली होती, मात्र काल या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय रियलिटी शो ‘बिगबॉस’चा ग्रँड प्रिमीयर काल पार पडला. बिगबॉस 2 च्या घरात कोणते सेलिब्रिटी जाणार यावरुन पडदा उचलण्यात आला आहे.मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे वीज बिगबॉसच्या घरातील पहिली स्पर्धक ठरली आहे. या स्पर्धेचा दुसरा स्पर्धक मालवणचे दिगंबर नाईक तर तिसरी स्पर्धक नेहा शितोळे ठरली आहे.
नेहा शितोळेनंतर कवी मनाचे नेते अभिजीत बिचकुले यांनी बिगबॉसच्या घरात प्रवेश केला. महाराष्ट्राची महागायक वैशाली मांडे हिने ‘पिंगा’ गाणं गात जबरदस्त एण्ट्री केली. यानंतर ‘राधा प्रेम रंग रंगली’ या मालिकेची अभिनेत्री वीणा जगताप हिनं बिगबॉसच्या घरात प्रवेश केला.
बिगबॉस मालिका कधी सुरु होणार? आणि यातील स्पर्धक कोण आहेत?, याची उत्सुक्ता शिगेला पोहचली होती. मात्र कालपासून सर्वांच्या आवडीच्या बिगबॉस रिअलिटी शो ला सुरुवात झाली आहे. या ‘रियलिटी शो’चं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
