Share

पूर्वी महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या जागा या दिल्लीतील कॉंग्रेसचे सरकार निश्चित करत असे : नितीन गडकरी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. जनतेने पुन्हा एकदा भाजप सरकारला निवडले असून देशाच्या प्रतिनिधित्वाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हातात दिली आहे. देशभरातून भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सगळीकडे वातावरण हे मोदीमय झाले आहे. तर कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आहे. याबाबत भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था ही अतिशय विदारक आहे. पहिले महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या जागा ह्या देशातील कॉंग्रेसचा विजय निश्चित करत असे, पण आता महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळत आहे. त्यावरून असे समजते की, जनतेचा आता कॉंग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेसला पराभवाच्या छायेतून जावे लागत आहे.

या लोकसभा निवडणुकीत देखील कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. केवळ पराभवच नाहीतर कॉंग्रेसला विरोधी पक्षाच्या बाकापासून दूर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण देशात कॉंग्रेसला ५२ जागा मिळवता आल्या तर महाराष्ट्रत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र काही राज्यांमध्ये कॉंग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!