🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून देशात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. तर राज्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनाआपला गड राखण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे प्रतापराव जाधव तर राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या लढतीमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याच दिसत आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे ५९ हजारांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार प्रतापराव जाधव यांना २०६९९३० तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांना १४८३०२ मत मिळाली आहेत.
सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस २०१४ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभेच्या ५४२ जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात ९०.९९ कोटी मतदारांपैकी जवळपास ६७.११ टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.
Live Update महाराष्ट्र : भाजप – २३ , शिवसेना – २० , कॉंग्रेस – १ , राष्ट्रवादी ३ , वंचित १
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
