Share

माढा : राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार संजय शिंदे नेमके कोण आहेत?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. डॅमेजकंट्रोल रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातूनराष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी.प.अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नावावर जवळपास निश्चिती झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजचं यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू आहेत. त्यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली . १९९९ मध्ये संजय शिंदे कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता. शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. शिंदेंना भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा देखील पाठिंबा आहे. विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याचे शिंदे संस्थापक चेअरमन असून विठ्ठल सुतगिरनीचे ते अध्यक्ष आहेत. याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिंदे संचालक आहेत. तसेच माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!