Share

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. पित्रोदा यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून कॉंग्रेसवर आता चौफेर टीका होऊ लागली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर कॉंग्रेसने सरकारला पूर्ण सहयोग करण्याचा शब्द कॉंग्रेसने दिला होता मात्र त्यानंतर वारंवार सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारतीय हवाई दलाने ३०० लोकांना मारले असेल तर ठीक आहे, असे म्हणत मात्र, याचे पुरावे दिले जातील का?, असा सवाल पित्रोदा यांनी उपस्थित केला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात किती दहशतवाद्यांना मारले आणि त्याने काय परिणाम झाला हे जाणून घेण्याचा भारतीय नागरिकांना हक्क नक्कीच आहे, असेही पित्रोदा म्हणाले.

पित्रोदा म्हणाले की मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील (काँग्रेस) विमानं पाठवू शकत होतो. परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, असे म्हणत पित्रोदांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राईकवर टीका केली आहे. एअर स्ट्राईक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!