Share

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- एल्गार परिषदेप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. तेलतुंबडे यांच्याकडे खालच्या न्यायालयात जामीनाचा मार्ग मोकळा असेल, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांचा एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. शिवाय अटकेपासून तीन आठवड्यांसाठी संरक्षण दिलं होतं. यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या