Share

मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे

Published On: 

मुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही दिले होते. आताही पुन्हा तीच मागणी करत आहोत. मात्र हे आरक्षण देताना कलम १६ आणि १७ नुसार कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे हवे, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी बुधवारी मांडली.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोग गुरूवारी ( ता. १५ नोव्हेंबर) आपला सादर करणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोग हा अहवाल बंद लिफाफ्यात राज्य सरकारकडे सुपूर्त करणार आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नगर शहरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे यात्रा येवला गावात पोहोचणार आहे़ संगमनेर,अकोले तालुक्यातील मराठा समाज बांधव बाभळेश्वर व कोपरगाव येथे संवाद यात्रेत सहभागी होतील. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!