Share

जिओच्या ग्राहकांना मोठा झटका; सर्वच मोबाईल रिचार्ज प्लॅन महागले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जिओ रिलायन्स कंपनीने (Reliance Jio Plans) प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आता अधिकचा भार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी एअरटेल (Airtel) व्होडाफोन-आयडिया (VI) या दुरसंचार कंपन्यांनी प्रीपेड मोबाईल रिचार्ज दरात वाढ केली होती. त्यानंतर आज मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनेही प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे.

लवकरच हे नवीन दर लागू केले जाणार आहेत. सर्वच दुरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला असून आता एक डिसेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. तुम्हाला जुन्या दरांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत रिचार्ज करुन लाभ घेऊ शकता. १ डिसेंबरपासून या सर्वच कंपन्यांच्या दरात वाढ होणार आहे.

कोणत्या प्लॅनमध्ये किती रुपयांनी वाढ?
७५ रुपयांच्या जिओ प्लॅनसाठी ९१ रुपये खर्च करावे लागतील. अमर्यादित प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर आता १२९ रुपयांच्या प्लॅनसाठी १५५ रुपये, १४९ रुपयांच्या प्लॅनसाठी १७९ रुपये, १९९ रुपयांच्या प्लॅनसाठी २३९ रुपये, २४९ रुपयांच्या प्लॅनसाठी २९९ रुपये, ३९९ रुपयांच्या प्लॅनसाठी ४७९ रुपये तर ४४४ प्लॅनसाठी आता ५३३ रुपये मोजावे लागणार आहेत.

५१ रुपयांच्या जिओ डेटा व्हाउचरसाठी, आता वापरकर्त्यांना ६१ रुपये, १०१ रुपयांच्या प्लॅनसाठी १२१ रुपये आणि २५१ रुपयांच्या प्लॅनसाठी ३०१ रुपये खर्च करावे लागतील. ३२९ रुपयांच्या जिओ व्हॅल्यू प्लॅनची किंमत आता ३९५ रुपये, ५५५ रुपयांच्या प्लॅनची ६६६ रुपये, ५९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ७१९ रुपये, १२९९ रुपयांच्या प्लॅनची १५५९ रुपये आणि २३९९ रुपयांच्या प्लॅनसाठी आता तुम्हाला २८७९ रुपये मोजावे लागणार आहेत. या वार्षिक योजनेसाठी तुम्हाला संपूर्ण ४८० रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!