🕒 1 min read
मुंबई: कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाना साधला आहे.
प्रताप सरनाईक खूप बोलत होते. पण, ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर ते आता कुठे गेले? अनधिकृत बांधकामाबाबत आता बोलती बंद झाली. संजय राऊत यांनाही नोटीस वर नोटीस आली. इंडीबाबत बोलणे त्यांना महागात पडले. त्यांनी ईडीला विनंती करीत ५५ लाख रुपये परत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना माफ केले. नाही तर संजय राऊत यांचाही नंबर होता, असा दावाही यावेळी किरीट सोमय्या यांनी केला.
दरम्यान उद्या किरीट सोमय्या अमरावती आणि परवा जालन्याचा दौरा करणार आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि ४० चौरांचा हिशेब लोकांपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी आता ट्वीट करत म्हटले आहे. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम काम ठाकरे सरकारने केले. शेवटी आम्ही राज्यपालांकडे गेल्यानंतर ठाकरे यांनी पाठ फिरवली आणि सर्व पेपर फाडले. आम्ही त्या ठिकाणी रुग्णालय बांधणार नाही, असे नंतर त्यांनी सांगितले. खरे तर हे रुग्णालय बांधण्याचे काम नव्हते, तर कोविडच्या नावाखाली जमीन बळकावण्याचे काम होते.असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल


