Share

सिडको पाणीप्रश्नी ‘शिवसेना’ आक्रमक; मनपाच्या अधिकाऱ्यांना घेराव!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सिडकोचा पाणीप्रश्न मांडला. सिडकोतील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी काय काय केले पाहिजे याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

माजी सभापती राजू वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शहरप्रमुखांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता धांडे, उप अभियंता पदमे, कनिष्ठ अभियंता चौधरी, तसेच शिवसेना उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल आदी उपस्थित होते. सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. या बैठकीत टँकर गाडीचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी सिडको एन-५ येथे गतिरोधक टाकण्यात यावे, प्रतापगड नगर येथील विहिरीचा पाईपलाईनचे काम थांबले आहे ते त्वरित पूर्णत्वास न्यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.

यासोबतच एन-८ इथे पाण्याचा व्हॉल्व खराब झाला आहे. तो लवकरात लवकर बदलावा, सिडको एन-७ येथील पाणी पुरवठ्याचा गॅप कमी करावा, एन-६ येथील पाण्याच्या टाकीवर गैरप्रकार घडतात ते टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यासाठी कमीत कमी कायमस्वरूपी एक सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यावर कार्यकारी अभियंता धांडे यांनी सर्व विषयांवर त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!