🕒 1 min read
औरंगाबाद : लाखो रुपये खर्च करून शासनाने पैठण नगर परिषदेला ९ घंटागाड्या दिलेल्या आहेत. मोठा गाजावाजा करून या घंटा गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र नगर परिषदेमार्फत केवळ औपचारिकता म्हणून स्वच्छतेची निविदा काढून ओंकारेश्वर या एजन्सीला तीन वर्षांसाठी देण्यात आली. या एजन्सीला महिन्याला साडे सोळा लाख रुपये दिले जाते. तर या घंटा गाड्यांच्या भाड्यापोटी नगरपरिषदला सहा ते सात हजार रुपये महिना दिला जात आहे. सुरुवातीला एजन्सी चालकाने गाड्यांची व्यवस्थित देखभाल केली. परंतु मुदत संपत आल्याने या घंटागाड्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सत्ताधारी-विरोधकांचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
एजन्सी चालकाच्या दुर्लक्षामुळे जवळपास सर्वच नव्या कोऱ्या घंटा गाड्यांची तीन वर्षातच दयनीय अवस्था झाली आहे. नऊ गाड्यांपैकी तीन घंटागाड्या तब्बल सहा महिने नादुरुस्त अवस्थेत नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात उभ्या होत्या. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच नादुरुस्त झालेल्या दोन घंटा गाड्यांची थातुर मातुर दुरुस्ती करण्यात आली. तब्बल सहा महिने या घंटागाड्या नादुरुस्त अवस्थेत नगर परिषद कार्यालयाच्या आवारात उभ्या असतांना नगराध्यक्ष, वन मुख्याधिकारी, सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी याबाबतीत एजन्सी चालकाला जाब विचारला नाही.
आता पुन्हा दोन घंटागाड्या नादुरुस्त झाल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसापासून उभ्या आहेत या दोन्ही गाड्यांचे सर्व चाके गायब आहेत. या गाड्यांची चाके दुसऱ्या घंट्या गाड्यांना लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. तर एका गाडीचे इंजिनचे काम करणे आवश्यक असताना ते दुरूस्ती करण्यात आली नाही. या गाड्यांची पाहणी काही दिवसापूर्वी विरोधी पक्षाचे नगरसेवक दत्ता गोर्डे व सोमनाथ परळकर यांनी केली होती. परंतु या बाबतीत त्यांनीही संबंधित ठेकेदार, विभाग प्रमुख यांना जाब विचारला नाही. सर्व नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती जोपर्यंत करून देत नाही तोपर्यंत या एजन्सी चालकाला देयके अदा करण्यात येऊ नये अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!

