नागपूर : सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट तयार केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या ‘वेब नागपूर’ या वेबसाईटचे लाँचिंग केले आहे. दरम्यान यावेळी राज्यपाल यांनी समाजासाठी निःशुल्क सुरु केलेल्या या वबसाईटला शुभेच्छा दिल्या आणि अजित पारसे यांच्या उपक्रमाचे कौतुकही केले आहे.
आता या वबसाईटवर लहान मुलांच्या लसीकरणासाठीची माहितीही देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात लहान मुलांना लस कुठे आणि कशी मिळेल, लसीकरण केंद्र कुठले आणि प्रशासनाचे आवाहन अशी सर्व माहिती यावर देण्यात येणार आहे.
यासोबतच लाईट बिल भरणे, कर भरणे, तक्रार करणे, तिकीट काढणे, गॅस सिलिंडर बुक करणे यासारखी कामेही ‘वेब नागपूर’ या वेबसाईटवरून करता येणार आहेत. खेड्यापाड्यातल्या लोकांना ऑनलाई व्यवहार कळावे, रोजच्या जीवनात आपल्या गरजांसाठी इंटरनेटचा सहज वापर करता यावा, यासोबतच सर्वसामान्य नागपूरकरांनी ऑनलाईन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट सुरु केल्याचे सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेतृत्व करायला शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचा आदर्श घ्यावा – रामदास आठवले
- तब्बल १५ वर्षांपासून दिल्लीत राहत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पोलिसांनी केली अटक
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- विद्या बालनची ‘मोंजोलिका’ भूमिका बघून अक्षयच्या मुलाला वाटायची भिती
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
