Share

नेतृत्व करायला शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचा आदर्श घ्यावा – रामदास आठवले 

Published On: 

बडोदा –  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे महान प्रणेते होते. प्रज्ञासूर्य म्हणून संपूर्ण विश्वाला मानवतेची समतेची बंधुत्वाची विज्ञानाची आणि ज्ञानाची प्रेरणा देत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि विचारांचा आदर्श घ्यावा. प्रेरणा घ्यावी. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले.

महाविद्यालयांमध्ये निवडणुकीची पद्धत होती. त्यातून संसदीय लोकशाहीचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हायचे. आता महाविद्यालयांमध्ये निवडणूक पद्धत बंद झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या  या संविधानाचा आणि त्यातील लोकशाही मूल्यांचा अभ्यास करावा त्यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी बडोदा येथे व्यक्त केला.

आपले जीवन स्वतःसाठी जगण्याबरोबरच समाजासाठी ही आपल्या जीवनातील काही भाग खर्च केला पाहिजे. नेतृत्व करायचे असेल तर स्वार्था पलीकडे जाऊन  समाजाचा, देशाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रनिर्माते महापुरूष राष्ट्रपुरुषांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. आताच्या राजकीय परिस्थितीत आजच्या नेत्यांकडून नेतृत्व गुण शिकताना विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. मोदींनी आपले जीवन पूर्णपणे देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे नेतृत्व कसे करावे हे शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून शिकावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे. असेही आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले. बडोदा येथील पारूल युनिव्हर्सिटी मध्ये स्कुल ऑफ लीडरशिप अंतर्गत लोकशाहीत युवकांचा सहभाग या विषयावर रामदास आठवले यांचा विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित केला होता. त्यात रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पारुल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु पारुल पटेल, डॉ हितेंद्र पटेल, तसेच छात्रभारतीचे अध्यक्ष कुणाल शर्मा,बडोदा मनपा स्थायी समिती अध्यक्ष जे बी पटेल, रिपाइं चे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी, प्रभारी जतीन भुट्टा, लीलावतीबेन वाघेला,राजेश कुमार गोयल उपस्थित होते. पारुल युनिव्हर्सिटीला  केंद्र सरकार च्या मंत्रलयातर्फे आपण मदत करू,गरीब विद्यार्थ्यांना पायल युनिव्हर्सिटी ने मदत करावी, विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रशिक्षणासाठी स्कुल ऑफ लिडरशीप ही संकल्पना चांगली असल्याचे  रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!