Share

सोमय्यांना कोणी सिरीयस घेत नाही; त्यांनी आधी स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्यावं – मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. यानंतर सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लावले जात होते.

अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री कोण हे जाहीर केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुश्रीफ यांच्यावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली होती. त्यात त्यांना काही मिळाले नाही. दोन वर्ष झाली तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही. आज सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने करत आहेत. सोमय्या यांना कोणीही सीरियस घेत नाही.’ असा टोला मलिक यांनी लगावलाय.

पुढे ते म्हणाले, ‘ स्वत:चा बडेजाव निर्माण करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम ते करत आहे. इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्या. मुलगा कुणाला फोन करतो, कुणाला खंडणी मागतो, तुमचे नातेवाईक काय करतात, त्यांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसं मनी लॉन्ड्रिंग करतात हे पण लोकांना माहीत आहे.’ त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर पलटवार केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!