Share

माझ नाव घेतल्याशिवाय मुश्रीफांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. तसेच चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार आहे.’ असे वक्तव्य आज हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

दरम्यान यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मुश्रीफांवर तोफ डागली आहे. ‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका. माझ्याविरोधात खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही.

हॅब्रीड अॅनोविटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि ४० टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅनोविटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होतीतर मग का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये सत्य असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही.’ असे प्रत्युत्तर आता पाटील यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!