Share

‘परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कडक निर्बंध लावावेच लागतील’, मंत्री नितीन राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्येने दुहेरी संख्या गाठल्यानंतरच परिस्थिती गंभीर झाली होती. आता तिसरी लाट उंबरठ्यावर असताना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच कडक निर्बंध लावावे लागतील. परंतु हे निर्बंध एकाएकी न लावता सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे परत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. गेल्या दीड महिन्यापासून एक आकडी असलेली रुग्णसंख्या आता दुहेरी झाली आहे. ही धोक्याची सूचना आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेवटी जबाबदारी माझी आहे. लोकांचे जीव जास्त महत्त्वाचे आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

नागपूर जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल सूचना व माहिती केंद्र व राज्य सरकारला पाठवली आहे. या संबंधात केंद्राकडून राज्याला मार्गदर्शक सूचना येईल. त्या नंतर राज्याच्या गाईड लाईन आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. कडक निर्बंधाच्या घोषणेवर व्यापारी संतप्त आहेत. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!