Share

घोटाळा प्रकरणात भुजबळांना दिलासा, कोर्टाकडून पंकज आणि समीर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची जमीन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने २०१५ मध्ये रायगड जिल्ह्यातील गृहनिर्माण प्रकल्पात फसवणूक केल्याच्या आरोपातून दोषमुक्त केले आहे. बुकींग करुन देखील तीन वर्ष झाली तरी देखील सदनिका सुपूर्द करण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

चेंबूरच्या येथील एका व्यक्तीने याबाबत तक्रारी दाखल केली होती. युनूस शेख यांनी १३ जून २०१५ ही रोजी तक्रार नोंदवली होती. त्यावरून पंकज भुजबळ, पुतणे समीर भुजबळ आणि देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे इतर दोन संचालक राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांच्यावर नवी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

२०१५ मध्ये भुजबळ बंधुसह दोघांच्या कंपनीने २,३४४ फ्लॅट विकण्याची योजना आखली होती आणि त्यांनी ४४ कोटी रुपये गोळा केले होते. मात्र हा प्रकल्प विकसितच केला नव्हता असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. दरम्यान, देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (डीआयपीएल) संचालकांनी आरोपातून मुक्त करण्यासाठी अर्ज केले होते. या प्रकरणात २५ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. सातभाई यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३९ अंतर्गत चारही व्यक्तींना निर्दोष ठरवत आरोपींची मुक्तता केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!