पंढरपूर – पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिरात फुलांचा सुगंध दरवळला असून मंदिर मनमोहक दिसत आहे.
आज पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड्स अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
