🕒 1 min read
मुंबई : राज्यात आज आणि उद्या विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
यंदाचं अधिवेशन मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, शेतकऱ्यांना मदत, रखडलेल्या नियुक्त्या, कोरोना काळातील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांमुळे वादळी ठरणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आज मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेच्या सभागृहात बोलताना मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे. भाजप नेत्यांच्या भूमिकेवरून त्यांनी चांगलाच हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.
मराठा आरक्षण प्रकरणी विरोधी पक्षातील काही नेते कधी माझा तर कधी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायचे. आता केंद्राची पूनर्विलोकन याचिका खारीज झाल्यानंतर हेच नेते केंद्रात कोणाचा राजीनामा मागणार आहेत? केंद्राला राजीनामा मागण्याची आणि प्रश्न विचारण्याची हिंमत या नेत्यांमध्ये आहे का? असा सवाल करतानाच त्यांनी खासदार संभाजीराजे यांचा एकमेव अपवाद वगळता एकाही नेत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्राला सवाल केला नाही. केवळ खा. संभाजी महाराजांनी समंजस भूमिका घेऊन जे विषय केंद्राकडे आहेत, ते सोडवण्यासाठी केंद्रानेच पुढाकार घेतला पाहिजे, असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार यांना ‘असा’ मुख्यमंत्री कसा चालतो? – नारायण राणे
- वारीसह गणेश उत्सव, बकरी ईदच्या परवानगीसाठी खा. इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’
- समाजासाठी गट-तट न पाडता एकत्र येत लढा उभारावा, मराठा क्रांती मोर्चाच्या मंथन परिषदेत आवाहन!
- संभाजीराजे वगळता एकाही नेत्याने मराठा आरक्षणावरून केंद्राला सवाल केला नाही – अशोक चव्हाण

