Share

#MPSC : ‘विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लावल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार’

Published On: 

🕒 1 min read

पुणे- राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे.

आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान,महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान,राज्यात झालाय शिक्षणाचा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांची दैना. ठाकरे सरकारची धरसोड विद्यार्थी वर्गाला उदध्वस्त करते आहे अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.१४ मार्च ला नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा चुकीचा निर्णय सरकारने घेतला आहे. हजारो विद्यालये, महाविद्यालये उपलब्ध असताना फिजिकल डिस्टंसिंग चे काटेकोरपणे पालन करत परीक्षा घेणं सहज शक्य आहे. अधिवेशन नको, परीक्षा नको; आपण सदासर्वकाळ परिस्थीपासून पळ काढू शकत नाही याचा विचार सरकारमध्ये बसलेल्या कुणीतरी करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,१४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पुढे ढकलण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लावल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार असे म्हणत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!