Share

Narayan Rane | “कोरोनाच्या औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते…”; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप 

Published On: 

🕒 1 min read

Narayan Rane | मुंबई : दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  संवाद मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली होती. ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’, असा खोचक सवाल केला होता. त्यांच्या याच टीकेला आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर?”, असे सवाल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केले आहेत.

त्याचबरोबर “तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा. कोरोनाचे औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते जरा सांगा. किती खोके, पेट्या औषधामध्ये गेल्या?”, असा सवाल त्यांनी केलाय. “माझ्याकडे कंपन्यांचा पुरावा आहे. मालक बोलायला तयार आहेत की, किती टक्के मागत होते. औषधांअभावी अनेक माणसं गेली. आणि हे टक्के मागत होते”, असे गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“आज भाजप भाकड पक्ष झाला आहे, यांच्या पक्षात आयात सुरु आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडून लोकं आयात केली जात आहेत. इथले गद्दार आमदार खासदार आहेत त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, असं सांगावं. यांना नाव शिवसेनेचं पाहिजे, बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद नरेंद्र मोदींचे पाहिजेत. तुम्हीं यादी काढा यांच्यात यांच्या पक्षाचे किती आणि आयात किती? हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:च काही शिल्लक नाही म्हणून बाहेरुन सगळे घेऊन समोर उभे केलेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले. तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!