🕒 1 min read
Bhavana Gawali | मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज (बुधवार) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतली. या बातमीने बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात देखील चर्चेला उधाण आले आहे. आदित्य यांची तेजस्वीसोबतची ही खासगी भेट होती, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामागे कोणत्याही प्रकारे राजकीय हेतू नव्हता. मात्र राज्यात राजकीय चर्चांना उत आला आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
“महाराष्ट्र सांभाळाता आला नाही आणि आदित्य ठाकरे बिहारमध्ये जात आहेत. आपले घर सांभळात आले नाही आणि आमच्यावर आरोप करता की गद्दार आहात. तुम्हाला सांभळता आलं नाही खरे गद्दार तर तुम्ही आहात. तुम्ही घर न सांभळाता दुसऱ्या ठीकाणी जात आहात. हे किती शोभणारे आहे त्यांनी विचार करायला पाहीजे,” असे भावना गवळी म्हणाल्या.
विनायक राऊत आणि नितीन देशमुखांवर संतापल्या –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी (Bhavana gawali) काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. यावेळी ठाकरे-शिंदे (Thackeray-Shinde) गट समोरा-समोर आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी गद्दार, गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या. भावना गवळी तोंडावर ‘गद्दार-गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे भावना गवळी प्रचंड संतापल्या आहेत. गवळी यांनी विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भावना गवळी म्हणाल्या, “विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली. अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल आणि बहिणीबद्दल केली असती तर ते पाहत उभे राहीले असते का?. त्यामुळे मी अकोला पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि अटक व्हावी.”
“मी अकोला स्टेशनवरुन मुंबईसाठी येत असतांना ही घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित कार्यकर्ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल अशा पद्धतीचे त्यांचे कृत्य होते. अत्यंत नीच वर्तन त्यांचं होत. हे सगळं काम विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी केले आहे. त्या मॉबमध्ये माझा जीव देखील केला असता,” असे भावना गवळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Lips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Ajit Pawar | “वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का?”; अजित पवार म्हणाले,
- Bhavana Gawali | “अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल आणि बहिणीबद्दल केली असती तर…” ; भावना गवळी राऊत आणि देशमुखांवर संतापल्या
- Health Tips | हिवाळ्यामध्ये सकाळी केळी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Supriya Sule | “ईडी सरकार हे इंग्रजांचं सरकार वाटतंय”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
