🕒 1 min read
Jitendra Awhad | मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ दिसत आहे. अशातच काल आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांच,किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढल गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं?, असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना केला आहे.
ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांच,किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढल गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास pic.twitter.com/S7T6xb61ft
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 15, 2022
तसेच, चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या, असं देखील आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ravikant Tupkar | शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!
- Sushma Andhare | “गोडबोल्या साखरझेल्या…” ; सुषमा अंधारेंची दीपक केसरकरांवर टीका
- Naresh Mhaske | “हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसलं” ; नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांना सवाल
- IPL 2023 | पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माने शेअर केली पोस्ट, म्हणाला..
- Sushma Andhare | “मी शिवबंधन सोडायला तयार आहे, पण…”; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
