Share

Alia Bhatt | रणबीर-आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कपूर घराण्यात चिमुकल्या लक्ष्मीचे आगमन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड (Bollywood)सुपरस्टार आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच आई वडील होणार आहेत. नुकतेच आलियाच्या बेबी शॉवर पूर्ण झाले आहे. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तेव्हापासून आलियाच्या बाळाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहे. त्यांचे कुटुंब आणि चाहते सर्वांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण आलियाच्या डिलिव्हरी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे.

आलिया भट (Alia Bhatt) ने दिला चिमुकल्या लक्ष्मीला जन्म

आज कपूर कुटुंबामध्ये एका नव्या लक्ष्मीच्या आगमन झालं. होय! आज रणबीर आणि आलिया आई-बाबा झाले आहेत. आज आलियाने एका गोंडस लक्ष्मीला जन्म दिला आहे. आज सकाळीच आलियाला मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी साठी भरती करण्यात आले होते. दरम्यान, आलियाने आज आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. आलिया आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर भट आणि कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर, या बातमीने आलिया आणि रणबीरचे चाहते देखील आनंदात आहे.

आज सकाळीच आलियाला मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी बातमी समोर आली होती की, आलिया कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकतो. तर नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, आलियाने एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघ त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडल्याची माहिती समोर आलेली आहे. 2018 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे रिलेशनशिप मध्ये आले होते. लग्नाआधी हे दोघे तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!