Share

Uday Samant | ‘टाटा एयरबस’ प्रकल्पावरून होणाऱ्या टीकेला उदय सामंतांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Uday Samant | मुंबई : नागपूरमध्ये होणारा  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर  महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उदय सामंत (Uday Samant)

उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे. एयरबस प्रकल्पावरून जो गाजावाजा करण्यात येत आहे. मला आर्श्चय वाटते आहे की, एका ट्वीटवरून जयंत पाटील असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. हे आमचं दुर्भाग्य आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं मी बोललो होतो. यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्नही केले. मात्र, पुढे अशी माहिती आली की 21 सप्टेंबर 2020 ला या प्रकल्पाचा एमओयू झाला होता. त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करू नये. विरोधात असताना बैठका सकारात्मक झाल्या असं म्हणणं खूप सोप्पं असतं.

महत्त्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही विरोधी पक्षनेते असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, तर केवळ गप्पा मारून, त्यांच्यात संभ्रम निर्माण करून किंवा ट्वीट करून उपयोग नाही. सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करायचे, हा पळपुटेपणा योग्य नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे.

दरम्यान, C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. हा प्रकल्प तब्बल 22 हजार कोटींचा असल्याचं समजतं आहे. या प्रकल्पाचे 30 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!