🕒 1 min read
पुणे : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच सरकार पडलं आणि नाइलाजाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजिनामा द्यायला लगला. हे सगळं झाल्यानंतर या सगळ्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे. काही लोक म्हणतात यात उद्धव ठाकरेंची चूक आहे. तर काही म्हणतात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला. अशातच ठाकरे सरकार नेमकं कोणत्या कारणाने पडलं याबाबत भाजप पक्षाचे बडे नेते आणि माजी आमदार राम शिंदे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले राम शिंदे ?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मीडियासमोर आले असते तर, महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं, असं राम शिंदे यांनी सांगितले आहे. राम शिंदे यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला,त्यावेळी ते बोलत होते. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे निराशेतून विधानं करत आहेत –
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीच मंत्रालयात गेले नाहीत. संघटनेची बैठक घेतली नाही. परंतू आता सरकार पडल्यानंतर ते खडबडून जागे झाले असून, बैठका घ्यायला लागलेत. तसेच सरकार पडल्यामुळे उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या निराशेतून विधानं करत आहेत. त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचं म्हणत राम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे.
राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी एक सांगताना ते असंही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस के घोडे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane । किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
- Best Range Electric Cars | भारतात जबरदस्त रेंजसह ५ इलेक्ट्रिक कार उपलब्ध, जाणून घ्या!
- Narayan Rane । उद्धव ठाकरे लबाड लांडगे भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा टोला
- Health Tips | रात्री गरम दूध पिणे आहे औषधासारखे, जाणून घ्या फायदे
- Narayan Rane । नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंची औकात काढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

