Share

४०% मुंबईकरांचा कोरोना आपोआप गेला? अँटीबॉडी चाचण्या करा, सत्य समोर येईल, आशिष शेलरांचा प्रशासनावर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे गेले ३ महिन्यांहून अधिक काळ आता जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, वाढणारी रुग्णसंख्या हि राज्यासह देशाला चिंताजनक आहे. तर, यात धारावीतील कोरोना आटोक्यात आल्याच्या दिलासादायक वृत्तानंतर आता मुंबईकरांबाबत एक चांगले सर्वेक्षण समोर आले आहे. सेरो सर्वेक्षणात हर्ड इम्युनिटी वाढत असल्याचं दिसून आलं आहे. तर,भाजपानं यावरून बृह्नमुंबई महापालिकेवर टीका केली आहे.

नीती आयोग, मुंबई महानगरपालिका, टीआयएफआर यांच्‍याकडून मुंबईत सेरो सर्वेक्षण करण्यात आलं. याच्या पह‍िल्‍या फेरीचा अहवाल आला असून, त्यात मुंबईच्या झोपडपट्टयांमधील सरासरी सुमारे ५७ टक्के नागरिकांमध्ये करोनाच्या ऍन्‍टीबॉडीज आढळून आल्या आहेत. तर बिगर झोपडपट्टी म्हणजे इतर रहिवासी भागांमधील रहिवाशांमध्ये सुमारे १६ टक्के ऍन्‍टीबॉडीज दिसून आल्या आहेत.

दरम्यान, आता यावर भाजपा नेते ऍड. आशिष शेलार यांनी आकडेवारी मांडत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या दाव्यावर प्रश्न केले आहेत. त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये, ‘नीती आयोग, मुंबई महानगरपालिका ऍन्‍टीबॉडीज अहवाल असं सागंतो की, महापालिकेच्या ३ वार्डांमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक ५७ टक्के, नागरिक वसाहतीत राहणाऱ्या १६ टक्के नागरिक पॉझिटिव्ह होते.’

 

तसेच, खासगी प्रयोगशाळाचा अहवाला असं सांगतो की २४ टक्के लोक पॉझिटिव्ह होते.तर ४० टक्के मुंबईकरांना करोना झाला आणि ते बरेही झाले का? चाचण्या उशिरानं वाढवण्यात आल्या? करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेनं १ लाख ऍन्‍टीबॉडीज टेस्ट करायला हव्यात म्हणजे सत्य समोर येईल, असं देखील स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आळींबी प्रक्रिया उद्योग इतर शेतकऱ्यांस प्रेरणादायी ठरेल – कृषीमंत्री दादाजी भुसे 

आता ‘या’साठी बँकाची वेळ सकाळी १० ते सांयकाळी ६

‘नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांना यापुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!