Share

आता ‘या’साठी बँकाची वेळ सकाळी १० ते सांयकाळी ६

Published On: 

वाशिम : खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून, कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकऱ्यालाही बँकेत विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २८ जुलै रोजी दिली.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाºया शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र, महा ई-सेवा केंद्र व बँकेकडे विमा हप्ता सादर करणे आवश्यक आहे.

दहावीचा निकाल लागला : राज्याचा निकाल ९५.३० टक्के तर यंदाही मुलींचीच बाजी

आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार २४८ बिगर कर्जदार व १ लाख ३७ हजार ८७० कर्जदार शेतकरी असे एकूण १ लाख ५० हजार ११८ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने सहभाग घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत असून उर्वरित शेतकºयांना या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी बँकेद्वारे विमा हप्ता स्वीकारण्याचा कालावधी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केला. या कालावधीत बँकेत येणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांसोबत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचाही विमा हप्ता स्वीकारण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही बँकांनी दिरंगाई केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद आहे.

‘नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांना यापुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!