मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहे. रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवानी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. यावर उपाय केला जाऊ शकतो का? तसेच यावर काय मार्गही काढता येईल का? यासंदर्भात राज्यात बकरी ईद साजरी होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत बैठक बोलावली होती. महत्वाचे म्हणजे बकरी ईद संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.
‘सरकारने खुशाल लॉकडाऊन लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू’
“मंत्रिमंडळातील नेत्यांची नियमावली तयार करण्याची जबाबदारी असते. पण सगळे तमाशा बघत आहेत. आज सर्व मुसलमान त्रस्त आहेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यांचे बकरे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत, बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. या सणानिमित्ताने शेतकऱ्यांना 300 ते 400 कोटी रुपये मिळतात”, असं अबू आझमी म्हणाले
“शरद पवार यांचे आम्ही खूप आभारी आहोत की, त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची सूचना दिली आहे. आम्ही सर्व मुख्यमंत्र्याकडे आमची बाजू मांडणार आहोत. सरकारने ट्रान्सपोर्ट बंद केला आहे. त्यामुळे नाशिकहून किंवा इतर भागातून ट्रकभरुन येणारे बकरे मुंबईत कसे येणार? हा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिली.
कामगार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्या – बच्चू कडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
