🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: राज्यपालांनी आपणास अपूर्ण वेळ दिले हे शिवसेनेचा मत होते . त्यामुळे शिवसेनेनी कोर्टात धाव घेतली आहे. अॉडवोकेट सुनील फर्नांडिस यांनी शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे होती .शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे, असं शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले होते. व आत्ताचा मिळालेल्या माहितीनुसार त्यावर उद्या सर्वोच्च न्यानालयात सुनवाई होणार आहे. न्या. बोबडे यांच्या न्यायालयात या याचिकेवर सुनवाई करण्यात येईल. उद्या त्यायमूर्ती बोबडे यांच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष राहील.
दुसरीकडे राष्ट्रवादीला राज्यपालांनी २४ तासांची मुदत दिली होती . भाजप, शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीला देखील जर सत्ता स्थापन करण्यास अपयश आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी परिस्तिथी उद्भविण्याची शक्यता दिसत होती. २४ तासांची वेळ मिळाल्यावर आज राष्ट्रवादीने राज्यपालांना मुदत वाढवायची विचारणा केली व निदान ३ दिवसांचा वेळ आम्हाला देण्यात यावा अशी राष्ट्रवादीची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती .
अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1194232191972065280?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1194224927785644032?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
