🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विनायक मेटे यांची बीड मतदारसंघाबाबत काहीही भूमिका असली तरी त्याचा फरक आम्हाला पडत नाही, असे म्हणत बीडच्या खा. प्रीतम मुंडे यांनी मेटेंबाबतची आपली भूमिका अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केली आहे. बीडमध्ये मुंडे आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यातला वाद हा विधानसभा निवडणुकीतही समोर आला आहे.
शिवसंग्राम पक्ष भाजपचा मित्रपक्ष असला तरी बीडमध्ये मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे याचं काम करणार नसल्याचं सांगितल जात आहे. याबाबत खा. प्रीतम मुंडे यांना विचारले असता, त्यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. मेटेंच्या भूमिकेचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी मेटे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीतही विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावाने यांना पाठींबा दर्शवला होता. त्यावरून विधानसभेलाही मेटे पंकजा मुंडे विरोधी भूमिका घेणार असल्याचं बोललं जात आहे. बीड विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंनी जयदत्त क्षीरसागरांना बळ दिल्याने, विनायक मेटे नाराज आहेत. शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या बैठकीत मेटे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182284115732643842?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182283864951029762?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182283804888592385?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
