Share

माळशिरसमधून लाखाचा लीड, आता शिंदे राजकीय संन्यास घेणार का ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा-  माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना अपेक्षित असलेले मताधिक्य मिळू शकले नसल्याने त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधकांची एकी व सुप्त मोदीलाट यामुळेच राष्ट्रवादीचे मताधिक्य मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचारावेळी जयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ, असे जाहीर केले होते. तर माळशिरसमधून लाखाचा लीड मिळाला तर राजकीय संन्यास घेऊ, असे संजय शिंदे यांनी म्हटले होते. माळशिरसमधून निंबाळकरांना लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे आता समोर आल्याने शिंदे राजकीय संन्यास घेणार का असा सवाल विरोधक विचारू लागले आहेत.

माळशिरस तालुक्यातून भाजपला एक लाखाचं मताधिक्य मिळवून दिलंय. लाखाचा लीड दिला तर राजकारणातून संन्यास घेऊ, असे कुणीतरी म्हणाले होते. ही माणसे आता राजकीय संन्यास घेणार का? भगवी वस्त्रं आणून देऊ का, असा खोचक सवाल शिवरत्न दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी संजय शिंदे यांना लगावला आहे .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!