Share

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : तरुणांची वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा बाजार भाव या कारणांमुळे आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावले उचलली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामी लक्ष घालत आहेत, अशी राज्य सरकारची पाठराखण करत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये, असे वक्तव्य केले आहे.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात आहेत. मात्र, शेवटी गरीब गरीब असतो. तो कोणत्या समाजाचा आहे हे न पाहता त्यांच्या विकासासाठी काय करता येईल, हे लक्षात घ्यावे लागेल. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. त्याला उत्तर शोधण्यासाठी सर्व राजकीय पक्षांशी विचारविनिमय सुरू आहे. मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहे, असे सांगत गडकरी यांनी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारची पाठराखण केली. बस फोडून किंवा हिंसक मार्गाने प्रश्न सुटण्याऐवजी त्यात कोणी तेल ओतू नये, असेही ते म्हणाले.

मराठा क्रांती मोर्चाला ‘हाच’ नेता करु शकतो शांत…!

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!