Share

Ajit Pawar | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 

Published On: 

🕒 1 min read

 Ajit Pawar | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालांमध्ये भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भाजप 156, काँग्रेस 17, आप 5 आणि इतर 4 जांगावर आघाडीवर आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे.  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस 39 तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहेत. या सर्व निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

“ज्यावेळी आप गुजरातमध्ये निवडणूक लढणार, हे निश्चित झाले होते, तेव्हा आपमुळे काँग्रेसला फटका बसेल, असं राजकीय विश्लेषक सांगत होते. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, त्याप्रकारे निकाल आले आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, “गुजरातमध्ये निकाल साधारण एक्झिट पोलनुसार पाहायला मिळाले आहेत. मात्र, अद्यापही स्पष्ट निकाल हाती आलेले नाहीत. गुजरातमध्ये आप आणि काँग्रेस हे दोघे वेगवेगळे लढले. त्यांच्या मतांची टक्केवारी स्पष्ट झाल्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल.”

”सुरुवातीला हार्दिक पटेल पराभूत होईल, अशी परिस्थिती होती. पाचवर्षांपूर्वी हार्दिकने स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, त्याने पक्ष बदलल्यानंतर त्याला लोकांनी फारसा प्रतिसाद दिला आहे, असं वाटत नाही. मात्र, एकंदरीतच निवडणूक आयोगाकडून आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर याबाबात विश्लेषण करता येईल”, असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलंय.

निवडणूक आयोग लवकरच कुणाला किती मते मिळाली हे जाहीर करेल, जे निवडून आले त्यांनी आता कामाला लागले पाहीजे, आणि जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नका पुन्हा कामाला लागा असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!