🕒 1 min read
Eknath Khadse | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा वाद विकोपाला गेला असतानाच महाजनांच्या टीकेमुळे आता खडसे कुटुंबीय भावूक झाले आहे. एकनाथ खडसे यांनी गेल्यावेळी टीका करताना, ‘बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही’, असे वक्तव्य केले होते. यावर उत्तर देताना मात्र त्यावर गिरीश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. “मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मला दोन मुली आहेत हे मात्र माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं, त्याच उत्तर खडसे यांनी द्यावं”, असं महाजन म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, “अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते.” मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना केला आहे.
पुढे ते म्हणाले, “साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो.” असे असताना निखील भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलीय.
“गिरीश महाजन यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या कुत्सित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राजकीय द्वेषापोटी माणूस किती खाली जाऊ शकतो, हेच यातून दिसते. हा सत्तेचा माज आहे. सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांना मनसेकडून उत्तर; म्हणाले, “हिमालयातून आलेल्या….”
- Eknath Khadse | “मुलाची हत्या की आत्महत्या, बोलायला लावू नका”, महाजनांच्या वक्तव्याला खडसेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,
- Sanjay Gaikwad | “…तर शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा
- Girish Mahajan | “एकनाथ खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?”; गिरीश महाजनांचा खळबळजनक सवाल
- Sudhanshu Trivedi | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सुधांशु त्रिवेदींचं स्पष्टीकरण; म्हणाले,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
