🕒 1 min read
Jitendra Awhad | ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना काल (मंगळवार) विनयभंग प्रकरणात तात्काळ दिलासा मिळाला. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आव्हाड यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, हे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
माहितीनुसार, भाजप नेत्या रिदा रशीद (BJP leader Rida Rashid) यांनी मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे रिदा या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षाही आहेत.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाणे न्यायालयात हजेरी लावली. जामीन प्रक्रियेची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आव्हाड न्यायालयात हजर होते. न्यायालयाने आव्हाड यांना अटी शर्तींवर जामीन दिला आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्यासाठी आणि जामीनदाराला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आव्हाड ठाणे न्यायालयात आले होते. यावेळी पोलिसांना हवं ते सहकार्य करेल आणि हा गुन्हा सिद्ध करतांना पोलिसांनाच नाकी नऊ येतील, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
यापूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यांवर होता. मात्र, या प्रकरणात त्यांना नंतर जामीन मंजूर करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- Akshay Kumar | आणखी एका रिअल लाइफ हिरोच्या बायोपिकमध्ये दिसणार अक्षय कुमार
- Chhagan Bhujbal | “आव्हाडांवर कारवाई केल्यानं सरकारची प्रतिष्ठा वाढली का?”; छगन भुजबळांचा शिंदे सरकारला सवाल
- Jitendra Awhad | “चित्राताई आपल्या नवऱ्याचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत…”, जितेंद्र आव्हाड यांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
- Ravikant Tupkar | शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!
- Sushma Andhare | “गोडबोल्या साखरझेल्या…” ; सुषमा अंधारेंची दीपक केसरकरांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
