Share

Chhagan Bhujbal | “आव्हाडांवर कारवाई केल्यानं सरकारची प्रतिष्ठा वाढली का?”; छगन भुजबळांचा शिंदे सरकारला सवाल

Published On: 

Chhagan Bhujbal |  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राज्यात एक नवीन वाद पेटलेला दिसत आहे. आव्हाडांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, “गर्दीत कोणलाही धक्का लागू शकतो. एखाद्यावेळी आपण हात लावून बाजुला सरकायला सांगतो, यात कसला आला विनयभंग?” अशा प्रकारे जर विनयभंगाचे गुन्हे दाखल होत असतील, तर लोकलमध्ये रोज महिलांना धक्के लागल्याच्या घटना घडत असतात, मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? आणि जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केल्याने सरकारची प्रतिष्ठा वाढली आहे का?”, असा सवाल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारला केला आहे.

महाराष्ट्राची ही परंपरा नाही

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीच बदला घेतला असल्याचं वक्तव्य केलं आहे. राजकारणात बदल्याच्या भावनेने कुणीच वागू नये. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. इतर राज्यात असे राजकारण होत असेल. मात्र, महाराष्ट्रात अशा राजकारणाला स्थान नाही. महाराष्ट्राची परंपरा सर्वांनीच जपली पाहीजे. सत्ताधाऱ्यांनी चांगले काम केलेल तर आम्हीही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत.”

तसेच केवळ बदनामी करण्यासाठी गुन्हे दाखल करू नये. जितेंद्र आव्हाडांवर जो गुन्हा दाखल झाला, तो अत्यंत चुकीचा आहे. उलट हे प्रकरण सरकारवरच उलटलेलं आहे. कारण या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वकाही स्पष्टपणे दिसत असल्याचं भुजबळ म्हणाले. “माझं मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही दोघंही समजदार आहात. तुम्ही अनेक वर्षांपासून तुम्ही आमच्या बरोबर काम करत आहात. त्यामुळे कोणाविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करावा, याचं भान ठेवायला हवं.”, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!