🕒 1 min read
Politics News | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर नेत्यांचे पक्षांतर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार प्रतावराव जाधव यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. महाविकास आघाडीचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री भेटतात, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचीच नाही तर ते इतर मंत्र्यांची देखील भेट घेतात. सत्ता गेल्यापासून महाविकास आघाडीतील नेते अस्वस्थ असल्याची टीका जाधव यांनी केली.
“उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नाही तर अनेक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युती सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या रात्री भेटी घेतात. सह्याद्रीवर जावून देखील ते भेटी घेतात. मी स्वत: हे अनुभवलेलं आहे”, प्रतापराव जाधवांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप होणार का?, अशी चर्चा सध्या होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीन राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आपला दावा सांगितला. शिवसेना कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार पर्यंत अनेक नेते एकनाथ शिंदेंसोबत आले. प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला झटका बसण्याची शक्यता आहे.
मध्यावधी निवडणुका नक्कीच होतील!
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी त्यामागचे कारण सांगितले की, केंद्र सरकार ज्या पद्धतीने एकामागून एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे नेत आहे आणि ज्या प्रकारे प्रलोभने दिली जात आहेत, त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता दाट आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठले होते, पण मशाल घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर आमचा भगवा फडकला.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “आदित्य ठाकरे कोण?, मला माहिती नाहीत”, म्हणणाऱ्या तानाजी सावंताना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- DY Chandrachud | वडिलांनंतर मुलगा न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीशपदी शपथ
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Uddhav Thackeray | “या मंत्र्यांना हाकला, नाहीतर…” – उद्धव ठाकरे सत्तारांवर कडाडले
- Vijay Shivtare | “सरकार बनवण्यासाठी अजित पवार सकाळी गेले होते तेव्हा..”, विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
