Share

IND vs BAN T20 | रोहित शर्मा सस्त्यात आऊट, ८ चेंडूत केल्या केवळ २ धावा

Published On: 

🕒 1 min read

IND vs BAN T20 |  भारतीय संघ आज T20 विश्वचषकातील चौथ्या सामन्यात बांगलादेशचा सामना करत आहेत. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी अॅडलेडमधील सामना महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. भारताने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. संघ गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जर आपण बांगलादेशबद्दल बोललो तर त्यांचे 3 सामन्यांत केवळ 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेटमुळे तो भारताच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान आजच्या सामन्यात भारताला पहिला झटका बसला आहे. रोहित शर्मा सस्त्यात आऊट झाला आहे. तस्किन अहमदच्या षटकात रोहित शर्माला जीवदान मिळाले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर राहुलने डीप बॅकवर्ड लेगवर चेंडू खेळला, सीमारेषेवर उभ्या असलेल्या हसनला संधी होती पण त्याने सोपा झेल सोडला. या षटकातही एकच धाव आली. त्यानंतर हसन महमूदने आपली चूक सुधारत रोहित शर्माला बाद केले. चौथ्या षटकाला आलेल्या महमूदने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण स्लिपमध्ये यासिर अलीकडे झेलबाद झाला. रोहितने 8 चेंडूत केवळ दोन धावा केल्या

भारताने संघात केला मोठा बदल-

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी आपापल्या संघात एक बदल केला आहे. जिथे भारताने दीपक हुडाला बाहेर ठेवत अक्षर पटेलला संधी दिली आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघात सौम्या सरकारच्या जागी शरीफुल इस्लामचा समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशची प्लेइंग -11

नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.

इंडियाची प्लेइंग -11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!