Share

Girish Mahajan | मनसे भाजप युती होणार ?, गिरीश महाजन यांनी केलं स्पष्ट म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Girish Mahajan | मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे त्यासंबंधीच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्या आहेत. कालपासून दिवाळी सणाला सुरूवात झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) दिपोमोहत्सव काल शिवाजी पार्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री तथा भाजप (BJP) पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray), एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपिठावर दिसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर भाजप-मनसे पक्षाची युती होणार का?, असे प्रश्नही अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन (Girish Mahajan)

गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना भाजप-मनसे पक्षाची युती होणार का?, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, शिवाजी पार्कवरील भेटीकडे राजकारण म्हणून बघण्याची गरज नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा पक्ष आम्ही एकाच मताचे आहोत. आमचे विचार आणि ध्येय एकच आहे. त्यामुळे त्यात गैर काय आहे, असं वाटत नाही. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मनसेबरोबरच्या युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे यांची महायुती होणार का?, अशी चर्चा सध्या राज्यात सगळीकडे सुरू आहे. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?, असं अजित पवार यांनी म्हटलं.

तसेच,  मनसे आणि भाजप पक्षाची युती खरंच होणार का?. कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाशी युती होणार हे आपल्याला आगामी निवडणुकींच्या काळात समजेल. त्यामुळे आगमी निवडणूका महत्वाच्या ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!