🕒 1 min read
(Amit Thackeray) मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसदर्भात मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पु्न्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी आणि पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी मागणी करत अमित ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं आहे.
ते पत्रात लिहितात की, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्टया मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त १२ ते १५ तास ! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते ! अशा शब्दात पोलिसांची व्यथा मांडत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
पुढे ते म्हणतात, हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील. फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील. पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरून गेलो असल्याचं त्यांनी या पत्रात म्हंटल आहे.
माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी. अशा आशयाचं पात्र अमित ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. त्यांच्या या पत्राला उपमुख्यमंत्री काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule । “बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पडणार” ; बावनकुळेंचे प्लॅनिंग काय?
- Blackheads Removal Tips | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स मुळे त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Sanjay Deshmukh । उद्धव ठाकरेंची खेळी, संजय देशमुखांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश; संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान
- Delhi Tour Guide | देशाची राजधानी दिल्ली फिरायला गेला तर ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
- Aravind Sawant | “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची कुठे आहेत?”; अरविंद सावंतांचा फडणवीसांना खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
