Share

Ravindra Waikar | नितेश राणे म्हणाले ‘मशाल’ नाही ‘आइस्क्रीम’ ; रविंद्र वायकर म्हणाले, “तोंडात…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं दिलेल्या निवडणूक चिन्हावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंना मिळालेली निशाणी मशाल नव्हे तर आईस्क्रीमचा कोन आहे, असं राणे म्हणाले होते. यावर आता शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी नितेश राणेंना उत्तर देत चांगलाच समाचार घेतला आहे.

“हा माणूस थंड पडला आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे हे कदाचित निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं. हा थंड माणूस आहे त्याच्या हातात आईस्क्रीमचा कोन द्यावा असं आयोगाला वाटलं. म्हणूनच निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला. आता तो कोन घेऊन फिरेल तो आणि त्याचा मुलगा,” असा टोमणा नितेश राणेंनी लगावला होता. यावर उत्तर देताना वायकर यांनी, “ती मशाल नसून कोन आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं,” असा टोला नितेश राणेंना लगावला.

काय म्हणाले होते नितेश राणे?

प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलेल्या नव्या चिन्हासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला ठाकरे गटाला लगावला. तसेच हे चिन्ह उद्धव ठाकरेंना का देण्यात आलं यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, ठाकरेंना ना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते. या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू.” असा खुलासा राणेंनी केलाय. यावर ठाकरे गटाकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!