Share

Ajit Pawar | “त्याची किंमत सर्वांनाच…”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकार बरखास्त करत, एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे-फडणवीस सरकार (Sate Government) होऊन आता जवळजवळ तीन महिने होऊन गेले आहेत. परंतू या सरकारवर  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरला इशारा दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच निधी अडवण्याच्या विरोधात काही नेत्यांनी न्यायालयात दाद मागितल्याची माहितीही अजित पवारांनी दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने काही दिवसांआधी पुणे जिल्ह्यातील महाविकासआघाडी सरकारच्या काळातील 50 कोटींच्या विकासकामांना स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या नाहीत, तसेच निविदा प्रक्रिया झाली मात्र काम सुरू करण्याचे आदेश नाहीत, अशी सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक निधी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!