Share

Dasara Melava | ठाकरे आणि शिंदेंची तोफ एकमेकांवर धडाडणार – दीपाली सय्यद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या दोन्ही दसरा सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार किंवा हाणामारी होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ एकमेकांवर धडाडणार आहे. दरम्यान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “दोन मेळावे होत आहे. कुणाकडे गर्दी जास्त होईल यापेक्षा दोन्हीकडे शिवसैनिक आहेत हे महत्वाचे आहे. त्यामुळे मला आनंद आहे की माझा प्रत्येक शिवसैनिक आज सेभेला येत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे मनात चुनचुन आहे. कुठेतरी गोष्ट स्थिर व्हायला हवी, मी वाट बघत आहे की दोन गट एकत्र व्हायला पाहीजेत. बाळासाहेब ठाकरे यांचा हात ज्याच्यावर आहे. ज्यांच्या विचाराला घेऊन लोक पुढे जात आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते.”

जो तुमचं काम करतो तो तुमचा नेता-

“शरद पवार यांनी देखील असाच बंड उभारला होता. राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण जो तुमचं काम करतो तो तुमचा नेता. आज दोन्ही ठीकाणी खूप गर्दी होणार आहे. शिवसेना आज जगात नंबर १ वर आहे. आज दोन गट आहेत पण हळू हळू सर्व ठीक होईल”, असे देखील दिपाली सय्यद म्हणाल्या.

दोन्ही मेळाव्याकडे देशाचे लक्ष-

उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर संबोधित करतील. या दोन्ही मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा ५ दशकांपासून सुरू आहे. मात्र या वर्षी दोन मेळावे होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!