Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या जिवाला धोका, ‘असा’ रचलेला त्यांना मारण्याचा कट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सत्ता मिळवली. एवढेच नाही तर त्यांचा स्वतःचा एक मोठा गट देखील स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा रंगू लागली. अशातच एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जिवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.

मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचं पत्र देखील मंत्रालयाच्या कार्यालयात आलं होतं. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना माओवाद यांनी देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या वारंवार धमक्यांमुळे खळबळ उडाली आहे. अनेक वेळा धमक्या आल्या असल्या तरी आता शिंदे मुख्यमंत्री पदावर असल्याने सतर्का वाढवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!