🕒 1 min read
मुंबई : 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो ९३ च्या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच मुद्यावरून भाजप पक्षाचे नेत्यांनी शिवसेना पक्षाला टार्गेट केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावरून सध्या महाराष्ट्रात नवीन वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. यानंतर यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे –
या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच याला जो कोणी जबाबदार असेल, त्याची दखल घेत दोषींवरह कडक कारवाई केली जाईल. असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार –
दहशतवादी विचारांना कोणी संरक्षण देत असेल तर असे लोक समोर आले आहेत, देवेंद्र फडणवीसांनी या संबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मी या निर्णयाचं स्वगत करतो असे मुनगंटीवार म्हणणाले. या प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या नेतृत्वात चौकशी होणार आहे. एलटी मार्ग पोलिस ठाण्याचे आधिकारी देखील तपास करणार आहेत. वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे. या कबरीचे सुशोभिकरण कोणी केले याचा शोध घेतला जाणार आहे.
पुढे ते म्हणाले कि,गेल्या सरकारमध्ये ही माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे पोहोचली होती की नाही, तेव्हा ते काय करत होते. झोपा काढत होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. मागच्या सरकारला ही माहिती होती का, गृहमंत्री रोज मुख्यमंत्र्यांना राज्यातील घटनांबद्दल अवगत करतात. ही – माहिती गृहमंत्र्यांना होती का, त्यांनी माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिली होती का हे तपासावे लागेल. जर त्यांना ही माहिती असून ही तत्कालीन सरकारने पायबंद का केला नाही, याची माहिती समोर आली पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले –
भाजपने याकूब मेमनची कबर बांधण्यासाठी परवानगीच दिली कशी? असा सवाल करत जे गद्दार आहेत, त्यांना गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? असा प्रश्नही त्यांनी केला. सणासुदीच्या काळात राजकारण करू नये, याकूब मेमन प्रकरणात काही तथ्य समोर आलं पाहिजे, त्या माणसाचं दफनच का झालं? तो अतिरेकी होता. त्याचं दन करण्याची गरज नव्हती, दफन करायचं असेल तर एनओसी घ्यायची असते, ती घेतली नाही, ती का घेतली नाही? पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही. ती एक खासगी संस्था आहे, एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला.
याकूब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली –
1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी ठरल्याने याकुब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. यावेळी त्याचं शव त्याच्या परिवाराला सोपवण्यात आलं असून त्यावेळी फडणवीस सरकार होती, असा आरोप शिवसेनेनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- AB de Villiers । विराट कोहलीच्या शतकानंतर एबी डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा, ट्विटरवर केला गौप्यस्फोट
- Bhaskar Jadhav । शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, भास्कर जाधवांविरोधात पोलिसांत तक्रार
- Devendra Fadnavis | याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांनी दिले आदेश
- Sudhir Mungantiwar । सुप्रिया सुळेंच्या सरकारमध्ये एवढे मुख्यमंत्री होते की मोजता येत नव्हते – सुधीर मुनगंटीवार
- Chandrashekhar Bavankule | “2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील”, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
