Share

शिवसैनिक हत्याकांड : आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांना प्रत्येकी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीआरपीसी 167 (2) नुसार 5 वे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस एस पाटील यांच्या कोर्टात वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणीदरम्यान जामीन मंजूर करण्यात आला.

केडगाव हत्याकांड गुन्हा गंभीर असल्याने आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, ९० दिवसात दोषारोपपत्र दाखल न झाल्याने आरोपींना जामीनाचा अधिकार असल्याचे म्हणणे आमदार जगताप यांच्या वकिलांनी मांडले. साक्षीदारावर दबाव टाकू नये, तपास यंत्रणेला मदत करावी, तपासी अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावल्यानंतर हजर राहावे या अटी ठेवत न्यायालयाने जामीन मंजूर केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!