Share

Ravi Rana | नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत… पुढे कोण? मोहित कंबोज यांच्या प्रश्नावर रवी राणा म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांला आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडी त्यांची कोठडी मागणार आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांचे एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी लिहिले आहे की, “नवाब मलिक, संजय पांडे आणि आता संजय राऊत! पुढे कोण?” मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र आमदार रवी राणा यांनी या प्रश्नाते उत्तर दिले आहे.

मोहित कंबोज यांच्या ट्विटचा उल्लेख आवश्यक आहे. कारण नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मोहित कंबोज हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी ‘संजय राऊत यांना अटक होईल आणि सलीम-जावेद जोडी तुरुंगात एकत्र बसतील’ असे म्हटले होते. मोहित कंबोज नवाब मलिक आणि संजय राऊत यांना सलीम-जावेद जोडी म्हणतात.

आमदार रवी राणा म्हणाले…

पुढे कोण?, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला. पण नाव दिले नाही. आमदार रवी राणा यांनी हे नाव सांगितले आहे. त्यानंतरचा क्रमांक अनिल परब यांचा असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. अनिल परब हे शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत.

ईडी निष्पक्षपणे तपास करत आहे-

भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा म्हणाले, “गेल्या एक वर्षापासून ईडी निष्पक्षपणे तपास करत आहे. संजय राऊत यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र राऊत यांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी हेराफेरी केली आहे. त्यांची सूत्रे दूरवर पसरली आहेत.आता हे प्रकरण अनिल परब यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यांनाही तुरुंगात जावे लागणार आहे.”

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल-

दरम्यान, संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. स्वप्ना पाटकर यांनी काल रात्री मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि ईडीसमोर गप्प बसण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अन्वये संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!