Share

J P Nadda on Shiv Sena : महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ BJP राहणार ; जेपी नड्डा यांचे मोठे विधान

Published On: 

पाटणा :  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपत आहे. आता केवळ भाजप राहणार, असे वक्तव्य नड्डा यांनी पाटणा येथे केले आहे. भाजपशी लढण्याची क्षमता अन्य कोणत्याही पक्षात नाही भाजपसोडून सर्व राजकीय पक्ष संपतील, असे नड्डा म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, आपली विचारधारेमुळे भविष्यात भाजप हा एकमेव राजकीय पक्ष उरणार आहे. बाकी सर्व काही मिटून जाईल. विचारसरणीच्या अभावामुळे आज भाजपच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष नाही. विरोधकांनी प्रयत्न केले तरी त्यांना आमच्यापर्यंत पोहोचायला 40 वर्षे लागतील. नड्डा रविवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 16 जिल्ह्यांतील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आणि सात जिल्ह्यांतील नवीन कार्यालयाची पायाभरणी करत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.

काँग्रेस देशातून उखडत आहे – जेपी नड्डा 

जेपी नड्डा म्हणाले की, “संपूर्ण देशात घराणेशाहीविरुद्धची लढाई हे भाजपसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भाजपने सुरुवातीपासूनच विचारधारा बाळगली आहे. काँग्रेस देशातून उखडत आहे. आपले पंतप्रधान UN मध्ये गेल्यावरही दक्षिणेतील कवीने लिहिलेल्या कवितांचे उदाहरण द्यायला विसरत नाहीत. आपल्या विचारसरणीच्या बळावर आपण त्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही कमळ फुलवू.”

भाजप हा विकासाचा समानार्थी-

देशातील अनेक राज्ये, काश्मीर, पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार, बंगाल, हैदराबाद, तेलंगणा, महाराष्ट्र यांचा उल्लेख करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, येथे एकाच कुटुंबाचे किंवा एकाच व्यक्तीचे सरकार आहे. काँग्रेसही भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे. कुटुंबवादाशी लढायचे असेल, तर प्रजासत्ताक देणाऱ्या या बिहारच्या भूमीचे स्मरण करावे लागेल. भाजप हा विकासाचा समानार्थी असून गरीब आणि शोषितांचा पक्ष आहे, हा विचार जनतेपर्यंत पोहोचवावा लागेल.

महत्नाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!